आनंददायी शनिवार

इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान सैनिक संघातर्फे आलेल्या माननीय कविता मुकुंद गायधनी मॅडमने महर्षी व्यास ऋषींबद्दल सखोल माहिती गोष्टीरूपातून सांगितली.अठरा पुराणाविषयी व्यास सांगतात की, परोपकार केल्याने पुण्य मिळते पण समाजास त्रास दिल्याने पाप होते ही समज त्यांनी समाजाला दिली.वेदराशीचे विभाजन केले म्हणून त्यांना व्यास म्हणतात. व्यासमुनी हे धर्मकारण,समाजकारण,अर्थकारण, शिक्षण, कला, विज्ञान यात पारंगत होते.एकूण 28 व्यास होऊन गेले आहेत.प्रत्येकाने अलौकिक कार्य केले म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली हेही त्यांच्या सांगण्यात आले. पुढे प्रश्नउत्तरे घेत गोष्टीचा शेवट झाला.अनेक कठीण शब्दांचे अर्थही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी गोष्टीबद्दलची माहिती वहीत लिहून घेतली. पुढे इयत्ता आठवी साठी गणित कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना झाकण, बांगडी व लोकर याच्या साहय्याने परीघ व व्यास मोजण्यास सांगण्यात आले. कोणत्याही वर्तुळाचा परीघ व व्यास यांचे गुणोत्तर समान असते हे विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवले. निरीक्षण, संशोधन व प्रायोगिक वृत्ती विकसित करणे व गणित विषय अधिक आनंददायी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी 67 विद्यार्थी व 39 विद्यार्थिनी हजर होते.त्याचप्रमाणे *कार्यानुभव* अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी ग्रीटिंग कार्ड व शोपीस तयार केले. संघाने काम केल्यामुळे मिळणारा अनुभव व कलेतील आनंद विद्यार्थिनींना अनुभवता आला.