समूहगान स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

समूहगान स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    12-Aug-2026
Total Views |
समूहगान स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
 
समूहगान स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
 
          सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यमाने शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी लोकहितवादी मंडळ व मराठा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या समूहगान स्पर्धेत १ली ते १०वी च्या सहभागी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

        या स्पर्धेत १ली ते ४थीच्या गटाने द्वितीय क्रमांक, ५वी ते ७वी च्या गटाने तृतीय क्रमांक, ८वी ते १० वी च्या गटाने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका सौ. मनीषा इनामदार व सौ.सावनी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजाला, सांघिक एकतेला आणि देशभक्तीपूर्ण सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद मिळाली.

         या यशासाठी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्षा मा. सौ.सुवर्णा दाबक, मुख्याध्यापिका सौ. मेघा वरखेडे, उपमुख्याध्यापिका सौ.वैशाली वाकचौरे, सौ.वैशाली मुळे, पर्यवेक्षिका सौ.स्वाती गडाख यांनी अभिनंदन व कौतुक केले.