“रक्षाबंधन” सण

12 Aug 2025 12:25:53

पूर्व प्राथमिक विभाग “रक्षाबंधन” सण साजरा करण्यात आला.

Raksha Bandhan Pre School M
 
सि.एच.एम.इ. सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम पूर्व प्राथमिक विभाग येथे शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी “रक्षाबंधन” सण साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला शिक्षिका सौ मयुरी तांबेकर यांचे मार्गदर्शनानुसार पर्यावरण पूरक राख्या बनविल्या.
शाळेच्या आवारातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना राखी बांधताना विद्यार्थिनींनी व शाळेने त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच प्रत्येक वर्गातील मुलांना मुलींनी औक्षण करून, राखी बांधून भावाबहिणींच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुलांनी बिस्किटे- खाऊ म्हणून आपल्या वर्गातील बहिणींना भेट दिले.
याप्रकारे शाळेत रक्षाबंधन परंपरेचा आनंददायी उत्सव साजरा झाला. 
Powered By Sangraha 9.0