टिळक सप्ताह 23 जुलै ते 1 ऑगस्ट २०२४

19 Jan 2024 16:17:10
 
lokmanya tilak
 

टिळक सप्ताह 23 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 

 23 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 हा संपूर्ण सप्ताह ‘ टिळक सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात आला. या सप्ताहाची सुरुवात 23 जुलै रोजी टिळकांच्या विविध गुणांची ओळख करून देण्यात आली. यावेळी टिळकांच्या जीवनावर आधारित एका छोट्याशा नाटिकेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. ज्यामध्ये टिळकांनी कशाप्रकारे स्वतःमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली हे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
यानंतर संपूर्ण सप्ताहभरात विविध गणितीय क्रियांचा रोज सराव करून घेण्यात आला. त्याचप्रमाणे इयत्तावार रोज जोर बैठकांचा सराव करून घेण्यात आला. या सप्ताह अंतर्गत विविध गणितीय मूलभूत संकल्पना दृढ करण्यासाठी चित्रकला स्पर्धा, भित्तिपत्रके तयार करणे, ब्रेसलेट तयार करणे, त्यासोबतच लेखी परीक्षा सुद्धा घेण्यात आली.
तसेच टिळकांची व्यायामाची आवड लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी जोरबैठका काढल्या. यातून स्पर्धा घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक काढून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच ओणकार कानशिडे आणि आर्यन शिवदे यांनी जोर बैठका, दंड, हनुमान दंड यासारख्या विविध व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविले.
टिळकांचा अजून एक गुण म्हणजे परखडपणा, स्पष्ट वक्तेपणा यासाठी विद्यार्थ्यांसाठी परिसंवादही आयोजित करण्यात आला. परिसंवादामध्ये ज्वलंत विषय विचारून विद्यार्थ्यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
गणितावरील विविध कविता विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केल्या . लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंचे जीवन चरित्र सांगणारा पोवाडा अतिशय उत्तम स्वरात विद्यार्थ्यांनी गायला. तसेच गणितावरील ‘अगणित पाय’ ही संकल्पना घेऊन चित्रकला आणि हस्तकलेचे प्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, तर समारोप लोकमान्य टिळकांच्या स्मृतीदायक गीताने
झाला.
Powered By Sangraha 9.0