व्यावसाय भिमुख शिक्षण 2024

व्यावसाय भिमुख शिक्षण 2024

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    09-Sep-2023
Total Views |

Business oriented education 1

 व्यावसाय भिमुख शिक्षण 2024 ”
असे म्हणणे योग्य आहे, याची प्रचिती विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विक्री उपक्रमातून सिद्ध केली.
“ तयारी उपक्रमाची
कौतुक विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे
प्रोत्साहन आपल्या आशीर्वाचनाचे
निमित्त विक्री उपक्रमाचे”
अशा सुंदर शब्दात उद्योग वर्धिनी या विक्री उपक्रमाचे निमंत्रण पालक, शिक्षक व पदाधिकारी यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शाळेचा ध्यास. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी, खरेदी करता यावी, विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी गौरी गणपती या पूजेला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आली.
 
राखी आणि अत्तर बनवण्यासाठी कच्चा माल आणला गेला. विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेतच राख्या व अत्तर तयार केले. याच दिवशी माता पालकांसाठी हळदी-कुंकू उपक्रम घेऊन त्यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे सरकार्यवाह माननीय श्री. हेमंत देशपांडे, शालेय समिती अध्यक्षा सौ.सुवर्णा दाबक व शालेय समिती सदस्य सौ. निर्मल अष्टपुत्रे व मुख्याध्यापिका सौ शुभांगी वांगीकर उपस्थित होत्या.
 
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेश व श्री सरस्वती मातेची आरती करून झाली. यावेळी श्रावणी हळदीकुंकू देऊन फुटाण्याचा प्रसाद देण्यात आला. उद्योग वर्धिनी या उपक्रमाचे उद्घाटन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करून सौ. सुवर्णा दाबक व सौ. निर्मल अष्टपुत्र यांनी चांद्रयानाच्या प्रतिकृतीला राखी बांधली व विक्री उपक्रमाला सुरुवात झाली.
 
या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या इतर विभागातील मुख्याध्यापिका विभाग प्रमुख यांनीही भेट देऊन खरेदी केली. यानंतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी राखी व पूजेचे साहित्य खरेदी करण्याचा आनंद घेतला. या उपक्रमांतर्गत स्टॉलवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या वस्तूची जाहिरात करून ती कशी विकावी याचा अनुभव घेतला. विक्री करणाऱ्या तसेच खरेदी करणाऱ्या दोनही विद्यार्थ्यांच्या अनुभवांमध्ये भर पडली.
 
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी वांगीकर व शालेय समिती अध्यक्ष सौ. सुवर्णा दाबक मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमास सौ. वरखेडे, सौ.घोटकर व सौ. सुवर्णा पाटील यांनी योगदान दिले. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला