वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    10-Mar-2023
Total Views |
 
 
prize
 
‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन’
 
चातुर्मासात 21 स्तोत्र विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतले होते या स्त्रोतांवर आधारित शास्त्रीय संगीत आणि स्तोत्र यांच्या संगमातून विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. यात गणपती वंदना ,सरस्वती वंदना, हनुमान चालीसा आणि शिवतांडव स्तोत्र यावरील नृत्ये लक्षवेधी ठरली. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध तबलावादक माननीय श्री. नितीन भानुदास पवार यांनी प्रमुख अतिथी पद भूषविले. संगीताचे फायदे तसेच संगीत क्षेत्रातील करियर यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच वर्षभरातील विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन यावेळी गौरविण्यात आले.