गणित दिवस

गणित दिवस

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    10-Mar-2023
Total Views |


गणितदिवस 

 
 
‘राष्ट्रीय गणित दिवस’
शून्यातून अनंताकडे या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत शून्याच्या पूजनाने राष्ट्रीय गणित दिवसाचे उद्घाटन झाले. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांच्या प्रतिमेचेही पूजन केले. तालबद्ध पाढे आणि गणित गीताने कार्यक्रमात जोश निर्माण झाला. मेंदूला खुराक मिळावा, गणनक्षमता वाढावी, निरीक्षण शक्ती आत्मसात व्हावी म्हणून तर्कशुद्ध विचारसरणीवर आधारित गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा सहा गटात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षेद्वारे त्यापैकी 30 विद्यार्थी निवडले गेले. वैयक्तिक फेरी,बझर फेरी, गणितज्ञ ओळखणे, गणिती कोडी, रॅपिड फायर अशा विविध फेऱ्यांमध्ये सर्व स्पर्धकांचा कस लागला. अशा चुरशीच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक विद्यार्थ्यांना देखील प्रश्न विचारून सहभागी करण्यात आले