आपल्या बस विभागविषयी माहिती

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    11-Mar-2020
Total Views |

से.हिं.मि.ए.सोसायटी,

नाशिक - ५

बस विभाग,

विद्याप्रबोधिनी प्रशाला मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या विद्याप्रबोधिनी प्रशाला (मराठी व इंग्रजी माध्यम), विद्याप्रबोधिनी प्रशाला सीबीएसई, शिशुविहार व बालक मंदिर (मराठी व इंग्रजी माध्यम) येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध करून दिली जाते. सदर बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त पालकांनी आपापल्या पाल्यांसाठी घ्यावा म्हणून संस्था आपल्याला आवाहन करीत आहे. स्कूल बस ही कशी उपयोगी व बसचे कोण-कोणते फायदे असतात हे आपल्याला पुढे उल्लेख केल्यानुसार लक्षात येईलच. स्कूल बसचे फायदे :

. स्कूल बसमुळे मुले एक्टीव्ह होतात.

. वेगवेगळ्या वयाच्या मुलांशी ओळखी होतात व एकमेकांमध्ये हिळून-मिळून वागण्याची सवय होते. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

. बसमध्ये मुलांच्या बॅग्ज व्यवस्थीत ठेवून बसायलाही जागा व्यवस्थीत मिळते.

. एकाच स्कूल बसमध्ये जास्त मुलं समाविष्ट होत असल्यामुळे हवेचे प्रदुषण होत नाही.

. बस मोठी असल्यामुळे जास्त मुलं समाविष्ट होतात व त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण आपोआपच कमी होते.

. स्कूल बसमुळे मुलांच्या वेळेची बचत होण्यास मदत होते.

. स्कूल बसमुळे मुलं आपापली काळजी घ्यायला शिकतात.

. स्कूल बसमध्ये मुलांची काळजी योग्य रितीने घेतली जाते. त्यामुळे इतर व्यवस्थेपेक्षा स्कूल बसमध्ये मुलांच्या

सुरक्षेबाबत सतर्कता पाळली जाते त्यामुळे बस व्यवस्था ही सुरक्षित व्यवस्था आहे.

. स्कूल बसमध्ये हवा खेळती रहात असल्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असते.

१०. स्कूल बसमध्ये जीपीएस सिस्टीम लावलेली असल्यामुळे बस कोणत्यावेळी कुठे आहे याची माहिती मिळण्यासमदत होते. त्यामुळे पालकांच्या वेळेची बचत होते.

११. बसचा विमा असल्यामुळे विमा संरक्षण मुलांना मिळते.

१२. मुलं शाळेत वेळेत पोहोचतात.

१३. आपल्या पाल्यासाठी इतर वाहनांऐवजी स्कूलबस लावल्यास आपल्या पाल्याची ३५ ते ४५ मि. इतक्या वेळेची बचत होईल.

१४. पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी रहात नाही.

१५. मुलींच्या संरक्षणासाठी लेडीज अटेंडट नेमण्यात येणार आहे.

१६. इ.७ वी व ८ वी च्या वर्गातील मुलांसाठी दर रविवारी रामदंडी मिलिटरी ट्रेनिंग कोर्स असतो त्यासाठी वेगळी फी आकरली जात नाही. वरील सर्व बाबींचा योग्य तो विचार करून आपल्या पाल्याकरीता बसचे सीट त्वरीत रिझर्व्ह करण्यासाठी

पुढील प्रमाणे बस फी संबंधीची माहिती देत आहोत.

 १. बस व्यवस्थेसंबंधीची पूर्ण माहिती संस्थेच्या बस विभागात मिळू शकते.

 २. बस फी दि. १५ जुलै पर्यंत पूर्ण भरल्यास ५ टक्के सूट देण्यात येईल.

 ३. बस फी दोन टप्प्यात भरावयाची असल्यास पहिला टप्पा १५ जुलै पर्यंत भरणे आवश्यक व दुसरा टप्पा ३० सप्टेंबर पर्यंत भरणे आवश्यक.

 ४. दोन टप्प्यात बस फी १५ जुलै पर्यंत भरल्यास ५ टक्के सुट देण्यात येईल. अन्यथा कोणतीही सुट मिळणार नाही.

     अधिक माहितीसाठी संपर्क : सौ. रक्षा जाधव – 9028702078

                                          शाळेचा दूरध्वनी क्र. – 0253 - 2309603