गुरुवार दि. १८ जुलै २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थनालयात एकत्र बसविण्यात आले.
या कार्यक्रमात निर्भया पथकाचे कार्य करणाऱ्या पोलीस सहाय्यक निरीक्षक सौ.भावना महाजन व पोलीस उपनिरीक्षक सौ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले त्यातील मुद्दे असे-
१. सध्याच्या परिस्थितीत मुलींवर होणारे अत्याचार , मानसिक व शारीरिक छळवणूक यापासुन विद्यार्थिनींची सुटका व्हावी यासाठी शहरात मा.आयुक्त श्री.विश्वास नांगरे पाटील यांनी निर्भया पथक सुरु केले आहे.
२. विद्यार्थिनींना तात्काळ मदत मिळावी या साठी या पथकाची स्थापना झालेली आहे. हे पथक २४ तास सक्रीय कार्यरत असते. तसेच तातडीच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर देखील विद्यार्थ्यांना देण्यात आला.
३.विद्यार्थिनींनचा पोशाख कसा असावा ?, समाजात वावरतांना वर्तवणूक कशी असावी या बाबत
मार्गदर्शन केले.
३. विद्यार्थी वर्गाने देखील व्यसनांच्या आहारी जाऊ नये व पालक व्यसनी असतील तर त्यांना त्याचे
तोटे समजावून सांगितले.
निष्पत्ती –विद्यार्थिनींना समाजात वावरत असतांना अचानक एखादा प्रसंग ओढवल्यास कोणाशी संपर्क साधावा म्हणजे आपणास मदत मिळू शकते ते समजले.
त्याचबरोबर आजकालच्या या बदलत्या प्रवृत्तीच्या समाजात वावरत असतांना आपण कोणती काळजी घ्यावी व सजग कसे रहावे ते समजले.