कारगिल विजय दिवस

28 Feb 2020 16:50:00
 
kargil vijay diwas
 
 
26 जुलै रोजी कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस विद्या प्रबोधिनी प्रशाला येथे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धातील शहिदांचे स्मरण करण्याबरोबरच या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धातील जवानांची कामगिरी दाखविणारा व्हिडिओ दाखविण्यात आला. कारगिल युद्धात सहभागी झालेल्या जवानांचे स्वगत सार्थक कदम, वरूण चौधरी,आर्यन शिवदे, तेजस पाठक, ओंकार कानशिडे, मयुरेश जोशी या विद्यार्थ्यांनी सादर केले.
शालेय गीत मंचाने जवानांचे देशाबद्दलचे प्रेम व त्यांच्या मातृभूमी विषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या काही देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.त्यानंतर सौ. संभेराव यांनी कारगिल दिनाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व त्यावर आधारित चार ते पाच प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले.
या सर्व प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फूर्तपणे उत्तरे दिली. या सर्व कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रासाठी बलिदान केलेल्या शहिदांसाठी आदर निर्माण झाला व त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत करण्याचा उद्देश साध्य करता
आला.
कार्यक्रमाची सांगता युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरूण चौधरी या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वांगीकर यांनी मार्गदर्शन केले.
धन्यवाद !
Powered By Sangraha 9.0