हिंदी कविता गायन स्पर्धा

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    26-Feb-2020
Total Views |

गणेशोत्सव
 
 
झूम मीटिंग द्वारे ऑनलाइन हिंदी कविता गायन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये २५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या कवींच्या कविता विद्यार्थ्यांनी तालात लयीमध्ये सादर केल्या सौ. सविता शाहीर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले सौ संगीता हिंगमिरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. यानंतर मधुरा कट्टी हिने हिंदी भाषा राष्ट्र की भाषा प्रजातंत्र के शास्त्र की भाषा हे गीत गायले त्यानंतर स्पर्धेचे सूत्र संचालन सौ. संगीता हिंगमिरे व श्रीम. मिनल काळोखे यांनी केले . विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर विचार करायला लावणाऱ्या कविता सादर केल्या. उदा.वृक्ष, बेटी,सैनिक, मानवता,प्रयास,इतिहास, नियत,लक्ष हे विषय मांडले. कोशिश करने वाले की हार नही होती, कदम मिलाकर चलना, हम सबकी प्यारी लगती सबसे न्यारी हिंदी हमारी, अंतिम इच्छा , वतन मेरे वतन, आज तू बिखरा है, सबसे ऊंची विजय पताका, दोस्त पुराने, अशा अनेक सुंदर कवितांचा समावेश होता. या कार्यकर्माचे परीक्षक सौ. सविता शाहीर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी हे विचार करणारे आहेत व चांगले विषय मांडले असे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार श्रीम. काळोखे मीनल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका मा. शूभांगी वांगीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.