डॉ. सुरेंद्र वैद्य

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    20-Feb-2020
Total Views |

 मा. श्री सुरेंद्र एम. वै
 
सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्यूकेशन सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी शाळेतील आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात मा. श्री सुरेंद्र एम. वैद्य गोदरेज आरोस्पेस उपाध्यक्ष हे प्रमुख अतिथी होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी चांद्रयान मोहिमेचा उद्द्श विदायार्थ्यांन समोर स्पष्ट केला. डॉ. विक्रम साराभाई (I.S.R.O. चे संस्थापक) यांनी स्थापन केलेली संस्था व ५० वर्षात यात झालेली प्रगती, व आलेख या संस्थेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केला. तसेच भविष्यातील या संस्थेचे प्रोजेक्ट काय आहेत तेही विद्यार्थ्यांना सागितले. रॉकेटची आतील रचना सरांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. उपग्रहाचे उपयोग, त्यांचे प्रकार तसेच नवीन तयार केले जाणारे उपग्रह, उपग्रहांची निर्मितीसाठी आवश्यक ईजिनिअरींग पदव्या या सर्वाची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना मिळाली. अवकाशातील उपग्रहाची संख्य निकामी उपग्रहाना नष्ट करण्याचे क्षेपणआश यांची माहिती स्पष्ट केली. या नंतर सरांनी गोदरेज आरोस्पेस या कपनी विषयी माहिती दिली. ब्राम्होस ची assembly या कंपनीत बनविली जाते तसेच वेगवेगळ्या रॉकेटसाठी लागणारे वेगवेगळ्या इंजिन्स या कंपनीत बनविले जातात. उदा. विकास, सि यु एस सेमी क्रियो, कूस, सी. ई-२० ईत्यादि तसेच रॉकेटमधील Control parts हि तयार केले जातात. या कापणीत होणारे production प्रक्रिया Video clip द्वारे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. रॉकेट प्रक्षेपन प्रक्रिया कशी केली जाते. चांद्र्यान मोहिमेसाठी भारताने दक्षिण ध्रुव का निवडला, चांद्र्यान-२ चे configuration तसेच चांद्र्यान मोहीम अपूर्ण राहिल्यामागचे, कारण विक्रम लॅडरचा संपर्ग तुटण्यामागचे कारण, अशा अनेक गोष्टीमागचे गुढ या व्याख्यानातून सरांनी विद्यार्थ्यांना उलगडले. यानंतर सरांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. बेसिक संशोधन करणाऱ्या संस्था कोणत्या? गगनयान मध्ये गोदरेज आरोस्पेस चा सहभाग काय असेल? सूर्याचा अभ्यास करणारी आदित्य मिशन याचे विशीष्ट काय? गोदरेज कंपनीची ताकत व कमतरता काय? अशा अनेक प्रश्नाची सुंदर उत्तरे सरांनी दिलीत यावेळी विद्याप्रबोधिनी प्रशालेत अनेक मान्यवरांनी प्रायोजित केलेल्या पारितोषिकांचे वितरण यावेळा मा. अतिथींच्या हस्ते करण्यात आले या वितरणाचे संचालन सौ. काळोखे मिनल यांनी केले. यात मध्य. शालांत परिक्षेत प्रथम येणारा विद्यार्थी तसेच मराठी गणित संस्कृत इग्रजी विषयात प्रथम उकृष्ट खेळाडूअशी अनेक बक्षीसे यावेळी देण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ.वांगीकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली मुळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.