शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी, सीएचएमई सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यम येथे प्रथम पालक कार्यकारिणी निवडणूक आणि सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पडली.
या कार्यक्रमात २०२५-२६ वर्षासाठी विशाखा समिती सदस्यांची देखील निवड झाली.
विभाग प्रमुख सौ वैशाली भट व सौ. कल्पना डमाळे यांनी पालक-शिक्षक समितीच्या नियमांबद्दल मौल्यवान माहिती दिली.
प्रत्येक वर्गातून एक वर्ग प्रतिनिधी म्हणून पालक-शिक्षक सदस्य निवडण्यात आले आणि त्यांच्यामधून दोन उपाध्यक्ष निवडण्यात आला.
मावळत्या कार्यकारिणीने त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नवनिर्वाचित पालक शिक्षक कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन!