‘मराठी दिन’
दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी विद्याप्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम येथे ‘मराठी दिन’ साजरा करण्यात आला. या दिवशी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात मराठी गीताने झाली त्यानंतर कुमारी सोमासे हिने मराठी दिनाचे महत्त्व सांगितले. कुमारी राधिका कुलकर्णी व आठवी ब हर्षिता बद्दर या विद्यार्थिनींनी रेल्वेचे गीत अभिनयासह नृत्य सादर केले.त्यानंतर मधील वरून चौधरी यांनी कविता सादर केली याबरोबरच मराठी साहित्य लेखन, लेखनाचे प्रदर्शन वर्गात मांडण्यात आले. यात विविध कथा, कादंबऱ्या, शब्दकोश, विश्वकोश मांडण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी शाब्दिक खेळ, शब्द कोडे, म्हणींचे खेळ मांडले तसेच व्याकरणातील नाम, सर्वनाम, क्रियापदे, यांची भित्ती पत्रिका लावण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी वांगीकर यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले.