तुळस

विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम इ.८वी ते १०    28-Feb-2020
Total Views |
तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते